पालिका आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुखपदी उपायुक्त प्रभात रहांगदळे

372

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल विभागाचे प्रमुख उपायुक्त प्रभात रहांगदळे यांची पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासह त्यांच्याकडे क्रीडा संकुल, तरण तलाव आणि या संकुलांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळे, सुरक्षा खाते, मुद्रणालय आणि नाट्यगृहांची जबाबदारी देण्यात आली आहे.

अग्निशमन दल विभागाच्या प्रमुखपदाची अतिरिक्त जबाबदारी अग्निशमन दल विभागाचे उपविभाग प्रमुख शशिकांत काळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर सहआयुक्त रमेश पवार (सुधार) यांच्याकडे अग्निशमन दलाचे अतिरिक्त कामकाज देण्यात आले आहे. दरम्यान, पी/दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांना बढती मिळाली असून त्यांची उपायुक्त पदी (सार्वजनिक आरोग्य) नियुक्ती करण्यात आली आहे. देविदास क्षीरसागर यांच्या पी/दक्षिणमधील साहाय्यक आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी पी/दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सहआयुक्त रमेश पवार (सुधार) यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) पदाचा कार्यभार संपुष्टात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या