पालिकेचे मिशन फॉर टीबी कंट्रोल!

171
bmc-2

मुंबई महानगरपालिकेने 2013 मध्ये ‘मिशन फॉर टीबी कंट्रोल’ उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या 2025 पर्यंत ‘क्षयमुक्त भारत’ उपक्रमांतर्गत पालिकेच्या माध्यमातून कृती आराखडा ‘क्षयमुक्त मुंबई योजना 2019-2025’ केंद्रीय क्षयरोग किभाग, राज्य क्षयरोग विभाग व इतर सहकारी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या कृती योजनेमध्ये रोगप्रतिबंधक व सर्व सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. पालिकेने तयार केलेल्या या ‘क्षयमुक्त मुंबई’ आराखडय़ाचे प्रकाशन बुधवारी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा हर्षला मोरे, नगरसेवक राजू पेडणेकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या