पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचा मालाडमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणाऱया पालिकेने आता मालाडमध्ये सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या सल्लागारांवर महापालिका तब्बल 55 कोटी 25 लाख 97 हजार 500 रुपये खर्च करणार आहे.

पालिकेकडून मुंबईकरांना दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे 2700 दशलक्ष लिटर पाणी सांडपाण्याच्या रूपाने समुद्राला जाऊन मिळते. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडून देणे सागरी पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लवकरच ही केंद्रे उभारण्याच्या कामाला पालिका स्तरावर सुरूवात झाली आहे.

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणार्या सांडपाण्याचे नियोजन करणे अनिवार्य बनते. यासाठी पालिका मुंबईत सात ठिकाणी सांडपाणी पुर्नप्रक्रिया केंद्रे उभारत आहे. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, घाटकोपर व भांडूप या सात ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहेत. यातील पुलाबा, वरळी, धारावी आणि वांद्रे येथे केंद्रे उभारली आहेत. तर वर्सोवा आणि घाटकोपर केंद्रासाठी सल्लागार नेमले आहेत. आता मालाड सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी पाऊले उचलली आहेत.

 

टाटा कन्सलटन्सी करणार काम

मालाड सांडपाणी प्रकल्पासाठी मे. टाटा कंसल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड या सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

यानुसार कंत्राटदाराला आलेल्या निविदांची छाननी करणे, त्यांचे मूल्यांकन करणे, निविदा स्वीकारण्याच्या निकषानुसार कंत्राटदाराची निवड, कामावर देखरेख करणे, कामात उद्भवणार्या अडचणी व त्रुटी निवारण्यासाठी सल्ला देणे, काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याची कामे सल्लागारांना करावी लागणार आहेत.

टाटा कंसल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड पंपनीने दिल्ली, अहमदाबाद या शहराबरोबरच पालिकेच्या भांडूप, घाटकोपर, धारावी, वर्सोवा आणि पुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रकल्पाचे काम केले आहे.