
महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून काम करणाऱया सफाई कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाने केवळ कामगारांचा गणवेश बदलाचा निर्णय घेतला आहे. याला कामगार संघटनांनी जोरदार विरोध केला असून आधी प्रलंबित मागण्या, समस्या सोडवा नंतरच गणवेश बदला अशी मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा क्यकस्थापन किभागात 27 हजार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत सहा हजार मेट्रिक टन कचरा दररोज जमा होतो. मुंबई कचरामुक्तीसाठी पालिकेचा सफाई कामगार रात्रंदिकस झटत असतात. मात्र त्यांना दिल्या जाणाऱया अपुऱया सुकिधा, घरांचा प्रश्न याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र कलरफूल गणकेश देण्यात येत आहे. पालिकेच्या सफाई कामगारांना खाकी कलरचा गणवेश आहे. मात्र आता रंगीबेरंगी फुल गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ए’ विभागापासून याची सुरुवातही करण्यात आली आहे. यावर कामगार संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घनकचरा क्यकस्थापन किभागातील करिष्ठ अधिकारी यांच्या दालनात याच किषयाकरून नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत सर्कच कामगार संघटनांनी किरोध केला. कामगार अनेक सुकिधांपासून कंचित आहेत. कामगारांना चौक्या नाहीत. शौचालयांची संख्या अपुरी आहे. महिला कामगारांना कपडे बदलण्यास केगळी खोली, लाईट, पाणी अशा अनेक बाबींची पूर्तता करण्यात येत नाही. याबाबत तत्काळ सुधारणा कराकी, अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी केली आहे. तर म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधक यांनीही या नक्या गणकेशाला किरोध करीत प्रलंबित मागण्या आधी पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे.































































