बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्यांकडून कारवाईचा खर्च वसूल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱयांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून आता संबंधितांकडून कारवाईचा खर्चही वसूल केला जाणार आहे. आज ‘के’ पश्चिम विभागातील जोगेश्वरी, अंधेरी, जुहू, विलेपार्ले, वर्सोवा येथे कारवाई करून 69 होर्डिंग्जसह 63 आधारखांबही हटवण्यात आले. महापालिकेच्या ‘के पश्चिम’ किभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), किलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशिकरा, कर्सेका क कर्सेका समुद्रकिनारा आदी परिसरात रस्ते आणि फुटपाथवर मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यामुळे रहिवाशांना चालणेही मुश्कील बनले आहे. याविरोधात रहिवाशांकडून पालिका प्रशासनाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर परिमंडळ-4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.