
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये पालिका सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणार आहे. यामध्ये 235 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी पालिका 1 कोटी 71 लाख 72 हजार 629 रुपये खर्च करणार आहे.
‘स्वच्छ वस्ती मोहिमें’तर्गत मुंबईत विविध ठिकाणी 652 शौचालये बांधण्यात आलेली आहेत, मात्र या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेकाट लाकण्यासाठी सोय उपलब्ध नसते. अनेकदा वापरलेले नॅपकिन्स कचऱयात टाकले जातात. त्यामुळे रोगराई आणि जंतुसंसर्गाचा धोका निर्माण होतो. काही वेळा हे नॅपकिन्स शौचकुपात टाकल्याने मलवाहिन्या तुंबणे, मलकुंड भरून वाहणे अशा समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. याआधी पालिका शाळांत सॅनिटरी नॅपकिन मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. आता झोपडपट्टय़ांमधील ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने गैरसोय दूर होणार आहे.


























































