BMW iX Electric SUV हिंदुस्थानात लॉन्च, किंमत 1.15 कोटी, जाणून घ्या फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी बाजारात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हेच पाहून अनेक कार उत्पादक कंपनी आपल्या नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करत आहेत. अशातच आता लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने आपली नवीन BMW iX Electric SUV हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. ही एक फ्लॅगशिप एसयूव्ही असून कंपनीने याची किंमत 1.15 कोटी रुपये (Ex-Showroom Price) इतकी ठेवली आहे.

या कारशी होणार स्पर्धा

कंपनीच्या या लक्झरी एसयूव्हीची बुकिंग सुरु केली आहे. तसेच 2022 च्या एप्रिल महिन्यात ग्राहकांना याची डिलिव्हरी मिळणार असल्याचे समजते आहे. हिंदुस्थानी बाजारात याची स्पर्धा Mercedes EQC, Jaguar i-Space आणि Audi E-Tron शी होणार आहे.

कार बनवताना प्लास्टिकचा केला वापर

या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार बनवताना जीवाश्म इंधनाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. तसेच ही कार बनवण्यासाठी कंपनीने कोणत्याही रिअर अर्थ मटेरिअलचा (Rare Earth Materials) चा देखील उपयोग केलेला नाही. ही कार बनवताना कंपनीने प्लॅस्टिकपासून लेदरपर्यंत रिसायकलिंग करून तयार केलेल्या सामग्रीचा वापर केला आहे.

फीचर्स

कंपनीने आपल्या या नवीन एसयूव्हीमध्ये फ्रेम-लेस विंडो बटण-ऑपरेटेड इलेक्ट्रिक डोअर ओपनर्स आणि सॉफ्ट क्लोज फंक्शन यासारखे फीचर्स दिले आहेत. याच्या दाराचे हँडल इंटिग्रेट करण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने यात 14.9 इंच इंफोटेनमेंट आणि 12.3 इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देखील दिला आहे. कंपनीने यामध्ये गोल स्टिअरिंगऐवजी हेक्सागोनल स्टिअरिंग व्हील दिले आहे.

अर्ध्या तासात होणार 80 टक्के चार्ज

या कारमध्ये दोन हाय व्होल्टेज बॅटरी देण्यात आली आहे. ज्यांची एकूण क्षमता 76.6 kWh आहे. एकदा संपूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 425 किमीचा पल्ला गाठू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर 11 kW AC च्या चार्जरने ही कार संपूर्ण चार्ज होण्यासाठी 7 तासांचा वेळ लागतो. तर 50 kW DC आणि 150 kW DC चार्जने ही कार अनुक्रमे 73 मिनिट आणि 31 मिनिटात 80 टक्के चार्ज होते, असं कंपनीचे म्हणणे आहे.