Beed News – आष्टी जवळ असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे नाव उलटून दोन महिलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. आष्टी ता परतूर जवळ असलेल्या गोळेगाव गोदावरी पात्रातून येथून बोटीच्या साह्याने पुरुषोत्तमपुरी येथे जात असताना गोदावरी नदीत काही काही अंतरावर भाविकांनी भरलेली बोट अचानक पलटल्याने एकच गोंधळ उडाला. अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले तरी यात दोन महिलाचा मृत्यू झाला.

 कांताबाई ज्ञानदेव आंधळे ( वय 68 रा. कुभेफळ ता सिंदखेडराजा) व प्रमिला शेषराव राठोड (वय 55 रा बीबी ता. लोणार जि. बुलढाणा) अशी मृत महिलांची नावे आहेत. अधिकमास निमित्त देशातील एकमेव असलेले भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे संख्येने भाविक दाखल झाले आहेत. याच दरम्यान गोदावरी नदी पार करताना भाविकांनी भरलेली बोट अचानक पलटल्याची घटना घडली. घटनेनंतर नदीकाठावर एकच खळबळ उडाली. व स्थानिक यांच्या मदतीने अनेकाना बाहेर काढण्यात यश आले आहे

काही क्षणांतच बोट उलटली..

बोट मधील काही महिलेच्या सांगण्यावरून माहितीनुसार, सुमारे 40 महिला व काही पुरुष भाविक बोटीत बसून नदी पार करत होते. मात्र बोटीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. नदीच्या मध्यभागी पोहोचताच बोटीचा तोल गेला आणि काही क्षणांतच बोट उलटली. त्यामुळे सर्व प्रवासी पाण्यात पडले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. असून येथे कोणतेही पोलिस प्रशासन व प्यारा कमांडो उपलब्ध नाहीत.