मायणी बोगस दस्तऐवज प्रकरण; दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत व्यक्तीला जिवंत भासवून जमिनीचा दस्त करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात दाखल असलेल्या गुह्यात दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह  दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदविली होती. त्यानंतर त्यांच्यावर ‘ऍट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, बोगस दस्तऐवज फसवणूकप्रकरणी भिसे यांच्या नावाने सह्या करणाऱया संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. आता दत्तात्रय घुटुगडे आणि महेश बोराटे यांना अटक झाली आहे. त्यांना आज वडूज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.