…म्हणून रविनाला कॉलेज सोडावे लागले

 

नव्वदच्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन मोठय़ा ब्रेकनंतर इंडस्ट्रीत परतली आहे. रविना आता ‘पटना शुक्ला’ या नव्या वेब सीरिजमध्ये दिसत आहे.  ‘पटना शुक्ला’च्या निमित्ताने रविना टंडनने कॉलेज जीवनाला उजाळा दिला. वयाच्या 17 व्या वर्षी रविनाने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यामुळे शिक्षणात खंड पडला. रविना म्हणाली, सलमान खानसोबत ‘पत्थर के फूल’ सुपरहिट झाल्यानंतरही  तिचे शिक्षण सुरू होते. एके दिवशी तिच्या प्राचार्यांनी तिला
ऑफिसमध्ये बोलावले आणि मी बाहेरून परीक्षेला बसून डिग्री मिळवावी, असा सल्ला त्यांनी दिला. कारण माझ्या सुरक्षेची खात्री ते देऊ शकत नव्हते. परीक्षा सुरू असताना मुले खिडकीतून उडय़ा मारून मला बघायचा प्रयत्न करायचे. मी चित्रपट साईन केले असल्यामुळे  मी अभ्यास कसा करेन, याची प्राचार्यांना चिंता होती.

l रविनाच्या मुलीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण होणार आहे.

l रविनाच्या मुलीने युकेमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.