अनिल देशमुख यांना पुन्हा ईडीची कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने मागितलेली कोठडी सत्र न्यायालयाने फेटाळत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असतानाच न्यायालयाचा हा निर्णय रद्द ठरवत उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

शनिवारी ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली होती. ईडीकडून देशमुख यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण ती न्यायालयाने नाकारली आणि देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अनिल देशमुख यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवून त्यांना पुन्हा ईडी कोठडी सुनावली.