फास्टॅग भरला नाही तर दुप्पट टोलवसुली! 17 मार्चला सुनावणी

महामार्गावरून प्रवास करणाऱया सर्व चारचाकी वाहनांना टोल नाक्यावर फास्टॅगद्वारे पैसे भरणे अनिवार्य असून फास्टॅग नसेल तर चालकांकडून दुप्पट पैसे वसूल केले जात आहेत. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश पुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर 17 मार्च रोजी त्यावर सुनावणी होणार असून पेंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक मंत्रालयाने 12 व 14 फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढत टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या