
मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम असून हायकोर्टात याप्रकरणी विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकांवर 24 जूनला सुनावणी होईल.
मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यात यावा यासाठी हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत याशिवाय मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हायकोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी त्रिसदस्यीय न्यायमूर्तींचे विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यात आले असून या याचिकांवर 24 जूनला सुनावणी होणार आहे.


























































