
>> डॉ. नीलम ताटके
आत्मचरित्र कसे लिहावे याचा काही साचा नाही हे फार चांगले आहे, अन्यथा आत्मचरित्र वाचणे हे नीरस आणि कंटाळवाणे झाले असते, पण हेच लेखन जर किस्से स्वरूपात लिहिले, स्मरणं लिहिली तर वाचायला छान वाटते, वाचनीय ठरते. असं चपखल वर्णन माझ्या पुढ्यात असलेल्या निवृत्त विंग कमांडर कमलाकर बलवंत गुणे यांच्या ‘कारण आणि सकारण’ या पुस्तकाविषयी म्हणता येईल.
सामान्य वाचकाला किस्से वाचणे, ऐकणे फार आवडते. त्यातच लेखक हवाई दलाच्या सेवेत 24 वर्षे होते. त्यामुळे याविषयी उत्सुकता वाचकांना निश्चित असते. यात लेखकाने अनेक विषयांना स्पर्श केला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अनुभव, कामकाज कसे चालते हे अनुभव वाचनीय आहेत. परदेशातील राहणीमान आणि आपल्या देशातील राहणीमान याची तुलना केली. यातील चांगला वाईट फरक मांडला आहे. लेखकाने स्वतः व्यवसाय करून त्यात यश मिळवले. व्यवसायात काय अडचणी येतात, कामगारांचे प्रश्न याविषयी मार्गदर्शन केले आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या विषयांवर योग्य प्रकारे भाष्य केले आहे.
स्वतःच्या आयुष्यातील बालपण, तारुण्य, वार्धक्य याविषयी लिहिले आहे. मिलिंद जोशी यांनी प्रस्तावनेत या आठवणींना स्मरणगंध असे म्हटले आहे. त्यांची लेखनशैली प्रवाही आहे. हे लेखन परिघाबाहेरचे आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
कारण आणि सकारण
लेखक : विंग कमांडर कमलाकर गुणे
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन
पृष्ठ : 256, मूल्य : रुपये 250/-





























































