लवकर बुस्टर डोस घ्या, अन्यथा ओमायक्रॉनचा संसर्ग वाढेल! जो बायडन यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक इशारा दिला आहे. ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट धोकादायक आहे, त्यामुळे लवकरात लवकर बुस्टर डोस घ्या, असा इशारा जो बायडन यांनी दिला आहे.

बायडन यांनी दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं आहे की, कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट वेगाने पसरणार आहे. हिवाळ्यात होणाऱ्या इतर संसर्गासोबतच कोरोनाची लस न घेणाऱ्यांसाठी हे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत मृत्युचा आकडा वाढू शकतो, असा इशारा बायडन यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या महामारीवर लसीचा बुस्टर डोस परिणामकारक ठरत आहे. बुस्टर डोसमुळे धोक्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

त्याला सहमती दर्शवताना बायडन यांनी, ओमायक्रॉन आतापर्यंत तितक्या वेगाने पसरलेला नाही, जितका पसरेल अशी भीती होती. पण, आता हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे नागरिकांना ताबडतोब बुस्टर डोस घ्यावेत, असा सावधानतेचा इशारा दिला आहे.