
बोरिवली पश्चिम साईबाबा नगर येथील ‘गीतांजली’ ही चार मजली इमारत आज दुपारी पत्त्यासारखी कोसळली. ही इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करून घेतल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र रस्त्याच्या कडेलाच असणारी ही इमारत कोसळल्याप्रसंगी अनेक पादचारी परिसरात होते. त्यामुळे यावेळी एकच घबराट उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल 8 फायर इंजिन, तीन रुग्णवाहिका, 2 रेस्क्यू व्हॅन आणि आवश्यक साधनसामग्रीसह दाखल झाले.
थरकाप उडवणारा व्हिडीओ
‘गीतांजली’ इमारत कोसळण्याआधी हलायला सुरुवात आल्याने परिसरात आवाज येऊ लागला होता. काही जणांनी व्हिडीओ शूट केला. त्यात इमारत पत्त्यासारखी कोसळत असल्याचा थरार कैद झाला.


























































