#Tokyo Olympic – खूशखबर! महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचा कांस्य पदकावर पंच

हिंदुस्थानची महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. मला सुवर्ण पदक जिंकायचेय, असा निर्धार लव्हलिना बोर्गोहेनने बोलून दाखविलेला होता. मात्री बुधवारी उपांत्य फेरीत तिच्यापुढे विद्यमान जगज्जेती असललेल्या तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली हिचे आव्हान होतं. बुसेनाज सुरमेनेली समोर तिनं जोरदार खेळी केली. मात्र तिला अंतिम फेरी गाठता आली नाही.

आसामची 23 वर्षीय लव्हलिना बोर्गोहेन जबरदस्त कामगिरी केली आहे. याआधी हिंदुस्थानला बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंग 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आणि महिला बॉक्सर मेरी कोम हिने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यांच्या रांगेत लव्हलिना बोर्गोहेन पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या