प्रेयसीला प्रपोज करण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू

731

अमेरिकेत राहणाऱ्या स्टीवन वीबर या तरुणाला प्रेयसीला पाण्यात प्रप्रोज करणे महागात पडलं आहे. प्रेयसीवर मनापासून प्रेम करणाऱ्या स्टीवनने तिला खुश करण्यासाठी पाण्यात प्रप्रोज करण्याचा बेत आखला. त्यासाठी तो पाण्यात उतरला. पण तो वर आलाच नाही. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ तो काढत होता. यामुळे  प्रेयसी केनेशा अन्टोईन हिने स्टीवनच्या आठवणीत तो व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

स्टीवनचे केनेशावर मनापासून प्रेम होते. केनेशावरील आपले हे प्रेम व्यक्त करण्याची तो एकही संधी सोडत नव्हता. यातूनच दोघांनी टांझानियाला सुट्टी घालवण्याचा प्लान केला. तिथे गेल्यावर स्टीवनने केनेशाला अनोख्या स्टाईलने लग्नाची लाईव्ह मागणी घालण्याचे ठरवले. त्यासाठी तो कॅमरा घेऊन पाण्याखाली गेला. तिथे गेल्यावर त्याने कॅमेरा ऑन केला. त्यानंतर त्याने केनेशासाठी लिहलेली चिठ्ठी दाखवली व अंगठी दाखवत तिला लग्नाची मागणी घातली. स्टीवनचा हा लाईव्ह व्हिडीओ बघून केनेशा भारावली. स्टीवन समोर आल्यानंतर त्याच्याशी बोलायचे असे तिने ठरवले व ती स्टीवनची वाट पाहत होती. पण स्टीव्हन आलाच नाही. व्हिडीओ काढताना स्टीव्हनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

स्टीवनच्या अशा अचानक जाण्याने दुखावलेल्या केनेशने फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तिने तो खोल पाण्यातून बाहेरच आला नाहीस. तू मला लग्नाची मागणी घातलीस. पण माझ उत्तर ऐकलच नाहीस. तर मी लाख लाख वेळा सांगते मला तुझ्याशीच लग्न करायचंय, असं म्हटल आहे. तसेच या नाही तर पुढच्या जन्मी आणि त्याच्याही पुढच्या जन्मी मी तुझ्याबरोबरच लग्न करणार असल्याचे सांगत केनेशाने स्टीव्हनवरील प्रेम व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या