ब्रेकिंग : हिंदुस्थानी वायुसेनेचे विमान अरुणाचलमध्ये बेपत्ता, शोधमोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
an-32-aircraft

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी वायुसेनेचे ‘एएन-32’ जातीचे वाहतूक विमान बेपत्ता झाले आहे. दुपारी एक वाजल्यापासून विमानाचा संपर्क तुटला आहे. या विमानामध्ये पाच प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स आहेत. या विमानाचा कसून शोध घेतला जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वायुसेनेच्या एएन-32 जातीच्या वाहतूक विमानाने सोमवारी दुपारी  12.25 वाजता आसामच्या जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केले होते. यानंतर अरुणाचल प्रदेशमधील मेंचुका एअर फील्डवरून हे विमान बेपत्ता झाले आहे. विमानाचा शेवटचा संपर्क दुपारी एकच्या दरम्यान झाला होता. त्यानंतर तब्बल दोन तास झाले तरीही विमानाचा संपर्क होऊ शकलेला नाही.

हिंदुस्थानी वायुसेनेने विमानाचा कसून शोध सुरू केला आहे. वायुसेनेने सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑप्स विमान शोधमोहिमेसाठी रवाना केले आहे.