मुंबई सेंट्रलवर उभ्या जयपूर एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग

717

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग नक्की कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रलवर कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर एक्सप्रेस (गाडी क्र. 12955) च्या एसी 3 टायर डब्याला आग लागली. बुधवारी सायंकाळी सहा वाजून 3 मिनिटांनी ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले असून कारणांचा तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या