ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या वस्तूंचा लिलाव, दोन कोटींपर्यंत लागू शकते बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा गांधी यांनी वापरलेल्या एक लहान वाटी आणि लाकडाचे दोन चमचे, लाकडी काटा या वस्तूंचा ब्रिटनमध्ये लिलाव होणार आहे. ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरात 10 जानेवारीला या वस्तूंचा लिलाव होईल. या वस्तूंची सुरुवातीची एकत्रित पिंमत 55 हजार ब्रिटिश पौंड अशी ठेवण्यात आली आहे. लिलावाचे कमिशन, जीएसटी, विमा, भाडे आणि कस्टम डय़ुटी अशी एपूण पिंमत हिंदुस्थानी चलनानुसार एक कोटी 20 लाख रुपये एवढी आहे.

ग्लोबल ऑनलाईन संस्थेच्या अंदाजानुसार महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तूंची बोली 80 हजार ब्रिटिश पौंडांपर्यंत जाऊ शकते. हिंदुस्थानी चलनात याची किंमत 2 कोटींपर्यंत जाईल. काही वेळा लिलावासाठी ठरवण्यात आलेल्या किमान रकमेच्या दोन पट किंवा तीन पट बोली लावली जाऊ शकते. ईस्ट ब्रिस्टल संस्था हा लिलाव करणार आहे.

महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तू, पत्र, पुस्तके, फोटो, पेंटिंग, सँडल, चश्मे आणि इतर वस्तू इतिहासप्रेमी आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणाऱयांना आकर्षित करतात. मात्र, महात्मा गांधींनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव ही दुर्मिळ घटना आहे. महात्मा गांधींनी वापरलेला कटलरी सेट त्यांचे शिष्य सुमती मोरारजी यांच्या संग्रहात होता.