बॉस तुस्सी ग्रेट हो! ड्रायव्हरपासून ते पीएपर्यंत रातोरात करोडपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनची ई-कॉमर्स कंपनी ’द हट ग्रुप’चे तब्बल 200 कर्मचारी रातोरात कोटय़धीश झाले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांच्या बॉसने घेतलेला योग्य निर्णय. कंपनीचे मालक मॅथ्यू मोल्डिंग यांनी आपल्या प्रॉफिटमधील 830 मिलियन पाऊंड म्हणजेच 8183 कोटी रुपयांचे शेअर कर्मचाऱयांना वितरित केले होते. जेव्हा कंपनीचे शेअर्स वेगाने वाढले तेव्हा कंपनीने खूप नफा मिळवला अन् कर्मचारीही रातोरात कोटय़धीश झाले आहेत. मॅथ्यू यांनी एक बाय बॅक योजना चालवली होती. ही योजना सर्व कर्मचाऱयांसाठी खुली होती. त्यासाठी कर्मचाऱयांची निवड कंपनीच्या मॅनेजरने केली होती. ही यादी मॅथ्यू यांना देण्यात आली होती. या योजनेचा फायदा कंपनीच्या ड्रायव्हरपासून ते मॅथ्यू यांच्या पर्सनल असिस्टंटपर्यंत तब्बल 200 कर्मचाऱयांना झाला आहे. मला इतके पैसे मिळालेय की वयाच्या 36व्या वर्षीच मी रिटायरमेंट प्लॅन करू शकते, असे मत पर्सनल असिस्टंटने व्यक्त केले आहे.

याबाबत मॅथ्यू म्हणाले, मी माझा आणि कंपनीचा नफा सर्वांना वाटला आहे. त्यासाठीच ही योजना होती. बरेच लोक व्यापाराविरोधात बोलत होते. परंतु शेअर्स नक्की वाढतील यावर मला विश्वास होता. 48 वर्षीय मॅथ्यू यांनी 2004 साली द हटची स्थापना केली होती. ही कंपनी जगभरात 164 देशांमध्ये कार्यरत आहे. सप्टेंबरमध्ये पर्ह्ब्जच्या अरबपतींच्या यादीत त्यांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे.