
सामना ऑनलाईन,बंगळुरू
कुमारस्वामी यांचे सरकार पाडल्यानंतर भाजपने सत्तास्थापनेसाठी हालचाली करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडीयुरप्पा यांनी आज कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. आपल्याला 105 आमदारांचे समर्थन असून आजच शपथविधी घेण्यात यावा अशी मागणी येडीयुरप्पा यांनी राज्यपालांकडे केली आहे.
कर्नाटक राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने,तीन बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द
यापूर्वी असं सांगितलं जात होतं की भाजप विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या निर्णयाची वाट पाहून त्यानुसार पुढची पावले उचलेल.मात्र शुक्रवारी सकाळी अचानक भाजपने सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना सुरुवात केली. 24 जुलै रोजी कुमारस्वामी सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलं होतं. यामध्ये काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीच्या पारड्या 99 मते पडली तर भाजपच्या पारड्यात 105 मते पडली होती.

























































