राजस्थान सीमेवर वसतेय मुस्लीम वस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पाकिस्तानला लागून असलेल्या राजस्थानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर मुस्लीम वस्ती हात पाय पसरत असल्याने बीएसएफने चिंता व्यक्त केली आहे. बीएसएफने सीमेवर वसलेल्या वस्त्यांची पाहणी केली असता ही माहिती समोर आली आहे. याबद्दलचा एक अहवालही बीएसएफने गृहमंत्रालयाला पाठवला आहे.

पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात मुस्लिमांच्या लोकसंख्येत अचानक वाढ झाली आहे. येथे येणारे मुस्लीम कट्टर पंथीय असून त्यांच्यावर रुझान आणि अरब संस्कृतिचा विशेष प्रभाव असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच गेल्या काही दिवसात येथील हिंदू-मुस्लीम नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरात मुस्लिमांच्या संख्येत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे बीएसएफने म्हटले आहे. त्यांच्या तुलनेत इतर समुदायांच्या लोकसंख्येत अवघी 8 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच येथील मुस्लीम नागरिकांमध्ये धर्माबद्दल कट्टर भाव निर्माण झाला असून मशिदीत जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.

त्याचबरोबर या भागात उत्तर प्रदेशातील देवबंदच्या मौलवींचा वावरही वाढला आहे. जैसलमेरमधील पोखरण, मोहनगढ इत्यादी भागात मौलवींचे येणे जाणे वाढले आहे. हे मौलवी मुस्लीम समुदायाने एकजूट कायम ठेवावी. नेहमी तयार राहावे असे उपदेश करत असल्याचे या अहवालात बीएसएफने म्हटले आहे. तसेच यामुळे सीमेवरील भागात तणाव निर्माण झाल्याचे बीएसएफने म्हटले आहे.