भडगाव बु. येथे बीएसएनएल टॉवरचे भूमीपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी असलेल्या बीएसएनएल टॉवरचे भूमीपूजन शिवसेना खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उपसरपंच तुळशीदास (बाबी) गुरव यांनी गणेशपूजन करून तर सरपंच सौ. प्रणिता गुरव यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला.

कडावल ते भडगाव बु.-भडगाव खु. ते कुपवडे या परिसरात BSNL मोबाईल रेंजची समस्या आहे. त्याकरिता ग्रामस्थांची मागणी होती की, या परिसरात टॉवर व्हावा. शिवसेना सचिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी टॉवरची मागणी मंजुर केली. हा टॉवर झाल्यास या भागातील मोबाईलची रेंज वाढणार आहे.

शिवसेना महिला आघाडीप्रमुख सौ.जान्हवी सावंत, डॉ. प्रविण सावंत व प्रमोद लोट यांनी केलेल्या सतत मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे. भूमीपूजनास तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परीषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परीषद सदस्य अमरसेन सावंत, पं स सदस्या शीतल कल्याणकर, माजी पं स सदस्य प्रविण भोगटे, विभागप्रमुख दिनकर परब, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, उपतालुका प्रमुख महेश सावंत, प्रभाकर मुंज, शेखर परब, सागर वाळके तसेच शाखाप्रमुख राजेंद्र लोट, माणिराज सावंत, माजी सरपंच रवी सावंत, भाई लोट, आबा गुरव, डी.एस.सरुक्कर, कृष्णा घाडी, ताता सावंत, जगन्नाथ सावंत, संतोष सावंत, अरुण माळकर, प्रविण आरेकर, आबा आरेकर, पुंडलिक आरेकर, आबा गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी भडगाव ग्रामपंचायत कार्यालयाला खासदार राऊत यांनी भेट दिली. सरपंच प्रणिता गुरव, उपसरपंच बाबी गुरव, ग्रा.पं. सदस्या समिता भडगावकर, प्रमिला सावंत व प्रिया गुरव, ग्रामसेविका सौ. कदम मॅडम, लिपिक राजू जडये व शिपाई बाबू कदम (आरेकर) यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपक्रम व कार्यभार याची आस्थेने चौकशी खासदारांनी केली.