
रायबरेलीमध्ये पोलिसांच्या हाणामारीत एका दलित तरुणाच मृत्यू झाला होता. तसेच आग्रा जिल्ह्यातही तीन दलित व्यक्तींचा खून झाला होता. या घटनेवरून बसप अध्यक्ष मायावती यांनी दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धारेवर धरले आहे.उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज आहे, अशी घाणाघती टीका मायावती यांनी केली आहे
1.यूपी की भाजपा सरकार में वैसे तो सर्वसमाज के लोग हर प्रकार की जुल्म-ज्यादती से पीड़ित हैं किन्तु दलितों के उपर अन्याय-अत्याचार की लगातार हो रही घटनायें अति-चिन्ता की बात है। रायबरेली में पुलिस बर्बता में दलित युवक की मौत व आगरा में तीन दलित की हत्या आदि अति-दुःखद व अति-निन्दनीय।
— Mayawati (@Mayawati) September 1, 2020
सरकारने मागासवर्गीयांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांत अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यात जंगलराज आहे अशी टीका मायावती यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अपहरण, खूनाच्या घटना समोर आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवर कायदा सुव्यवस्थेवरून जोरदार टीका केले आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी ब्राह्मणांवर अत्याचार झाल्याची तक्रार केली होती. आता मायावतींनी दलितांचा प्रश्न मांडला आहे.




























































