बुलढाणा जिल्ह्यात एसबीआयचे 3 एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व खामगाव तालुक्यातील एसबीआय बँकेचे तीन एटीएम गॅस कटरच्या मदतीने कापून लाखो रुपयांची रोकड लंपास करण्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सदर प्रकार लक्षात येताच बँक कर्मचार्‍यांची धावपळ सुरू झाली.

चिखली तालुक्यातील शेलुद आणि उंद्री तर खामगाव तालुक्यातील पळशी बु।। येथील एसबीआय बँकेच्या एटीएमला चोरट्यांनी आपला निशाणा बनवला. चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने मशीन कापून उंद्री येथील एटीएममधून 9 लाख, शेलुद येथील एटीएममधून 27 लाख आणि पळशी बु।। येथून 19 लाख रुपये अशा एकूण 55 लाख रुपयांची रोकड लंपास केली.

आपली प्रतिक्रिया द्या