
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात एका मंदिराच्या पुजार्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात पुजारी गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
A priest of a temple at a village in Itia Thok, Gonda was shot at last night. He was admitted to a hospital. Case has been registered against 4 persons. He had land dispute with the accused. We are investigating the matter: Shailesh Kumar Pandey, Gonda Superintendent of Police pic.twitter.com/7MWA91Vx0E
— ANI UP (@ANINewsUP) October 11, 2020
मिळालेल्या माहितीनुसार महंत सम्राट दास आणि भुमाफियांमध्ये जमीनीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी काही गुंडांनी राम जानकी मंदिराच्या मनोरम उद्गम ठिकाणी महंतांवर गोळीबार केला. या गोळीबारात महंत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.



























































