बैलगाडीतून प्रचार करणे उच्चशिक्षण मंत्र्यांच्या अंगलट, बैल उधळल्याने उडाली तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानच्या उच्चशिक्षण मंत्री किरण माहेश्वरी यांच्या प्रचारादम्यान बैल उधळल्याने एकच तारांबळ उडाली. किरण माहेश्वरी उदयपूर मधील राजसमंद विधानसभा मतदार संघात बैलगाडीतून प्रचार करत असताना हा प्रकार घडला. सुदैवाने माहेश्वरी या नुकत्याच बैलगाडीतून उतरल्या आणि बैल बिथरून गाडीसह सैरावैरा पळू लागले.

rajesthan-bailgadi

शनिवारी माहेश्वरी कार्यकर्त्यांसह बैलगाडीतून प्रचार करत होल्या. मात्र ऐनवेळी बैल बिथरल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे प्रचार रॅलीमधील कार्यकर्ते देखील मिळेल त्या मार्गाने पळू लागले. बैलगाडीच्या धक्क्याने परिसरातील वाहनांचे नुकसान झाले. कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांना सुरक्षीत स्थळी नेऊन मोठ्या शिताफीने बैलांना शांत केलं. मात्र बैल शांत झाल्यानंतर पुन्हा बैलगाडीतून प्रचार करणार नाही असा माहेश्वरी यांनी कानाला खडा लावला.