
मुंबईतील शेट्टी समाजाचे आधारस्तंभ आणि बंट्स संघाचे माजी अध्यक्ष एम.डी. शेट्टी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मंगळुरूच्या मुलूर पंकणागुत्तू या खेडेगावातून मुंबईत आलेल्या एम.डी. शेट्टींनी हॉटेल कामगारापासून सुरू केलेला संघर्ष यशस्वी हॉटेल मालकापर्यंत नेला. त्यांनी बंट्स संघासाठी आपल्या आयुष्यातील 70 वर्षे वेचली. तसेच बंट्स संघाचे अध्यक्षस्थान भूषविल्यानंतर संघाच्या इमारतीची निर्मिती, महिला विभागाची स्थापना केली. त्यांच्या निधनाने बंट्स समाजावर शोककळा पसरली आहे.


























































