शॉर्टसर्किटमुळे बेस्टच्या एसी बसला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टच्या एसी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मागाठाणे आगाराची ए- 288 ही कंत्राटी बस क्रांतिनगर येथून कांदिवली स्थानक पूर्व या मार्गावरून धावत असताना अलिका जंक्शनजवळ ही घटना घडली. बसचालकाच्या केबिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. त्यानंतर चालकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांना बसमधून उतरवले. त्यानंतर चालकाने अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली.