अवघ्या 18 दिवसांत सिनेमा तयार, ’सी यू सून’ मंगळवारी होणार प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 1 सप्टेंबर रोजी मल्याळी सुपरस्टार फहद फाजिल याचा ’सी यू सून’ हा सिनेमा ऍमेझॉन प्राईम व्हिडीयोवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा लॉकडाऊनमध्ये तयार करण्यात आला आहे. हा थ्रिलरपट आहे. त्याचे शूटिंग फक्त 18 ते 20 दिवसांत पूर्ण झालं असून सिनेमाच्या युनिटमध्ये अवघ्या 15 जणांना समावेश होता, अशी माहिती दिग्दर्शक महेश नारायण यांनी दिली.

शूटिंगसाठी कोविड प्रोटोकॉल आणि केरळ सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करून हे प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे महेश नारायण यांनी सांगितले. सोशल मीडियावर चॅटिंग करणारा युवक एका तरुणीच्या प्रेमात पडतो. एके दिवशी ही तरुणी गायब होते आणि आत्महत्येचा प्रयत्न करते. त्यानंतर सिनेमाचा हीरो फहाद फाजिल या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो, असं ‘सी यू सून’चे कथानक आहे.