आंदोलनकर्त्यांवर ड्रोनची नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

जुन्या दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील आंदोलनकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. स्वराज अभियान आणि एआयएसए या संघटनांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. दर्यागंज येथे हजारो आंदोलनकर्त्यांना बॅरिकेडस् लावून अडवण्यात आले. ड्रोन दिसल्यावर आंदोलनकर्त्यांनी ओरडून, टाळ्या वाजवून घोषणाबाजी केली. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि काही अनुचित प्रकार घडल्यानंतर दोषींना ओळखता यावे, यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.