आपण पाकिस्तान होत चाललोय! ‘सीएए’वर भालचंद्र नेमाडे यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या नागरिकत्व सुधारित सुधारणा कायद्याविरोधात जोरदार आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने म्हणजे अराजकतेचे लक्षण आहे. आपली वाटचाल हिंसक पद्धतीने चालली असून आपण पाकिस्तान होत चाललो आहोत, अशी प्रतिक्रिया भालचंद्र नेमाडे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

‘हे अराजकतेचे लक्षण आहे आणि हे काढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणे कठीण आहे. आता आपली काटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरू आहे, असे मला वाटते. आपल्या देशात असे कधी नव्हते. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.’

गरीबाला नागरिकत्व नाकारणे योग्य नाही

‘नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग आहे. राजकारणी लोकांचा हा विषय नाही. आपल्या देशात गुप्तहेर, दहशतकादी, त्या देशातून हाकलून दिलेले गरीब-अनाथ आणि हा देश आवडतो म्हणून येणारे असे 100 प्रकारचे लोक येतात. त्या सर्वांना एकाच मापाने मोजणे बरोबर नाही. ज्यांना यायचं त्यांना येऊ द्यावं. सरकारची इतकी मोठी यंत्रणा आहे. त्यावर इतका खर्च होतो. त्यामुळे त्यातील दहशतवादी कोण आहेत हे शोधणं सरकारचं काम आहे. मात्र, कोणत्याही गरीब नागरिकाला या देशाचं नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नाही’ असेही भालचंद्र नेमाडे म्हणाले.