CAA विरोधात ठराव आणला, भाजपने रोकडे आणि बोराडेंना पक्षातून निष्कासित केले

bjp-logo

केंद्र सरकारने पाकिस्तान, बांग्लादेश अफगाणिस्तानसारख्या शेजारी राष्ट्रांमधील पीडीत अल्पसंख्यकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळावे यासाठी CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू केला आहे. हा कायदा लागू व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष प्रयत्न केले होते. याच कायद्याविरोधात दोन नगरपरिषदांमध्ये प्रस्ताव आणण्यात आला होता. परभणी जिल्ह्यातील सेलू आणि पालम या दोन नगरपरिषदांमध्ये हा प्रस्ताव आणण्यात आला होता. हा प्रस्ताव आणल्याने आणि त्याचे समर्थन केल्याने भाजपने विनोद हरीभाऊ बोराडे आणि बाळासाहेब गणेश रोकडे या दोघांना पक्षातून निष्कासित केले आहे. बोराडे हे सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आहेत तर रोकडे हे पालम नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांना पक्षातून निष्कासित करत असल्याबद्दलचे लेखी आदेश जारी केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या