
सौदी अरेबियामध्ये एका उंटाची तब्बल 14 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. हा जगातील सर्वात महागडा उंट ठरला आहे. त्याची सात दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांमध्ये बोली लागली आहे.
उंटासाठी सौदी अरेबियात सार्वजनिक लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषेतील एक व्यक्ती मायक्रोफोनद्वारे लिलावात बोली लावताना दिसत आहे. उंटाची सुरुवातीची बोली 5 मिलियन सौदी रियाल म्हणजेच सुमारे 10 कोटी 16 लाख रुपये ठेवण्यात आली होती. त्यानंतर उंटाचा 7 दशलक्ष सौदी रियालमध्ये लिलाव करण्यात आला. हा उंट कुणी खरेदी केला, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. हा जगातील दुर्मीळ उंटांपैकी एक मानला जातो. उंट त्याच्या खास सौंदर्य आणि वेगळेपणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जगात या प्रजातीचे उंट फार कमी आहेत.
























































