
तेलंगणच्या कामारेड्डी जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथे 200 भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आले आहे. राज्यात कुत्र्यांच्या मृत्यूंची संख्या 500 झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्तता देण्याचे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुत्र्यांना ठार मारण्यात आले आहे. त्यासाठी हे भयंकर कृत्य त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. याप्रकरणी पोलिसांनी गावातील सरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































