
ज्या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला आहे. बॉलिवूडची जगप्रसिद्ध सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिने अखेर या महोत्सवात धमाकेदार हजेरी लावली. रेड कार्पेटवर अवतरताच ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवासाठी तिने खास डिझाइन केलेला गडद निळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. या गाउनवर अतिशय उत्कृष्ट व वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन होती. या ग्लॅमरस गाउनसोबत तिने एक मॅचिंग दुपट्टा परिधान केला होता, जो तिच्या दोन्ही हातांना गुंडाळलेला असून जमिनीपर्यंत दिमाखात पसरला होता. आपला लुक पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्याने गळ्यात एक नाजूक व सुंदर हार परिधान केला होता आणि दोन्ही हातांत आकर्षक अंगठ्या घातल्या होत्या. अगदी हलका मेकअप करून तिने आपले केस मोकळे सोडले होते. रेड कार्पेटवर येताच तिने हसतमुखाने आणि कमालीच्या आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय माध्यमांना पोझ दिल्या. तिचा हा सुंदर गाउन प्रसिद्ध डिझायनर मोहित रॉय यांनी डिझाइन केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा लुक समोर येताच जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.































































