Photo – प्रभादेवी फेस्टिवलला आदित्य ठाकरे यांची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवी येथे आयोजित प्रभादेवी फेस्टिवलला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. 

शिवाज्ञा फाउंडेशनचे संस्थापक सचिव प्रणित खडपे यांनी हा फेस्टिवल आयोजित केला होता. हे या फेस्टिवलचे तिसरे वर्ष होते. 

प्रभादेवीच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक वारशाला उजाळा देणाऱ्या या उपक्रमाचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी फेस्टिवलमधील विविध स्टॉल्सला देखील भेटी दिल्या.