
भक्तीचा उत्सव आणि आधुनिक संगीत जल्लोष यांचा संगम असलेला ‘द भक्ती ट्राइब’चा ‘भजन क्लबिंग’ हा कार्यक्रम 6 जून रोजी दादर पूर्व येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी येथे सायंकाळी 7 वाजता होईल. डॉ. नारायण रामन आणि नमो भजन क्लब यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘द भक्ती ट्राइब’ हा 11 कलाकारांचा व्यावसायिक म्युझिक ग्रुप समूह उत्तर आणि दक्षिणेकडील भक्तिपरंपरा एका मंचावर आणतो. एका मंचावर मराठी, हिंदी, तमिळ किंवा संस्कृत परंपरा एकत्र येतात तेव्हा संगीत केवळ सादर होत नाही, तर लोकांना जोडणारा अनुभव बनते, असे या ग्रुपचे संस्थापक आणि व्हायोलिनवादक डॉ. नारायण रामन यांनी सांगितले. हा कार्यक्रम सशुल्क आहे.




























































