बिबवणेत कारला अपघात : चार जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे टॅकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या साईडपट्टीवर जाऊन उलटली. कार उलटल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या त्या टॅकरने तिला धडक दिली. या अपघातात कारमधील चार जणांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी रात्री घडला.

गोव्याहून कणकवलीच्या दिशेने महामार्गावरून एक टॅकर येत होता. बिबवणे येथे त्या टॅकरला मुंबईच्या दिशेने जाणारी एक कार ओव्हरटेक करीत होती. ओव्हरटेक केल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार डाव्या बाजूच्या साईडपट्टीवर जात उलटली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या त्या टॅकरची कारला किरकोळ धडक बसली. कारमध्ये चालकासह चार प्रवासी होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. कुडाळ पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.