मिश्र त्वचेची काळजी कशी घ्यावी? वाचा टीप्स

सर्वसाधारणतः चेहऱ्याच्या त्वचेचे तीन भाग पडतात. एक तेलकट, एक कोरडी आणि तिसरी मिश्र. यापैकी पहिल्या दोन पद्धतीच्या त्वचांसाठी वेगवेगळी उत्पादनं बाजारात मिळतात. पण, मिश्र त्वचेची काळजी घेणं हे एक आव्हान असतं. अशा त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टीप्स पुढीलप्रमाणे आहेत.

फेस वॉश
फेस वॉशची खरेदी करताना नेहमीच कॉम्बिनेशन स्किन / मिश्र त्वचेचा फेस वॉशच खरेदी करा. हा फेस वॉश दिवसातून दोन वेळा – सकाळ आणि संध्याकाळ जरूर वापरा. कॉमबिनेशन स्किन असेल तर तुम्हाला त्वचा थोडी शुष्क वाटेल किंवा थोडी तेलकट वाटेल. यासोबतच तुम्हाला ड्राय आणि सेन्सेटिव्ह स्किनसुद्धा जाणवू शकते.

यामुळे नेहमीच अनसेंटेड, इरिटेशन फ्री फॉर्म्युल्याचा फेस वॉशच खरेदी करा. याचा वापर करण्याआधी नेहमीच चेहऱ्याला कोमट पाण्याने धुतले पाहिजे. यानंतर फेस वॉशचा वापर खूपच हलक्या हातांनी गोलाकार पद्धतीने करा. मग हे धुवून चेहरा कोरडा करून घ्या.

साबणाचा वापर टाळा
तुमची कॉम्बिनेशन स्किन वा मिश्र त्वचा असेल तर कधीही ती साबणाने धुवू नका. साबणात बहुतांश वेळा रसायनांचे प्रमाण जास्त असते. अशा साबणामुळे त्वचेचे पीएच बॅलन्स (PH balance)बिघडून जाते. असे झाल्यास त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्या सुरू होतात.

एक्सफोलिएट
साधारणपणे तेलकट त्वचा असल्यावर पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करतात. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद करणारी डेड स्किन आणि तेल बाहेर येत असते. पण तेलकट त्वचेची समस्या तुमच्या ‘टी झोन’मध्येच असेल तर तुम्ही केवळ तेवढाच भाग स्क्रब केला पाहिजे. चेहरा धुतल्यानंतर आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करणे विसरू नका. फक्त स्क्रब लावताना हलक्या हातांनी लावा आणि कोमट पाण्याने धुतल्यानंतर कोरडे करून घ्या.

हायड्रेट
त्वचा हायड्रेट करण्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझरही असे निवडावे लागेल, जे ऑइल फ्री असेल. हे मॉइश्चरायझर ताबडतोब त्वचेत शोषून घेतले जाईल असे असावे. या मॉइश्चरायझरला शुष्क त्वचेवर चांगल्या पद्धतीने लावा. असे केल्याने तुमच्या त्वचेला खाज येणे आणि घट्टपणा यासारख्या समस्यांपासून संरक्षण होईल.

गरम पाण्याने अजिबात तोंड धुवू नका
कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्हाला काही बाबी कायम लक्षात ठेवाव्या लागतील. यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे गरम पाण्याचा चेहऱ्यावर अजिबात वापर होऊ नये. जास्त उष्ण पाणी कॉम्बिनेशन स्किन/ मिश्र त्वचेला आणखी खराब करत असते.