
यूट्यूबवर बॉलीवूड चित्रपटाच्या कॉपीराइट उल्लंघनाच्या आरोपावरून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलीवूड चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी पिचाई यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांनी त्यांच्या 2017 मधील ‘एक हसीना थी एक दीवाना था’ चित्रपटाचे हक्क कोणालाही विकले नाहीत किंवा तो रिलीज केला नाही, तरी देखील, तो लाखो व्ह्यूजसह YouTube वर उपलब्ध आहे.
त्यांनी दावा केला आहे की, गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दिवाना था’ यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली. त्यांच्या चित्रपटाच्या बेकायदेशीर अपलोडद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जात आहेत.
“गुगलचे प्रतिनिधीत्व करत असल्याने मी सुंदर पिचाई यांना जबाबदार धरतो. मी माझ्या ‘एक हसीना थी एक दीवाना था’चे 1 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज रेकॉर्ड केले आहेत. कंपनीकडे ही चिंता व्यक्त करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” दर्शन म्हणाले.
पिचाई यांच्यासोबत, गौतम आनंद (यूट्यूबचे प्रमुख), जो गियर- तक्रार अधिकारी आणि टेक जायंटचे चार कर्मचारी एफआयआरमध्ये नाव असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आहेत.
‘एक हसीना थी एक दिवाना था’ हा चित्रपट सुनील दर्शनने लिहिला, निर्मिती आणि दिग्दर्शित केला होता. यात शिव दर्शन, नताशा फर्नांडिस आणि उपेन पटेल यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
सुंदर पिचाई यांना नुकताच हिंदुस्थानकडून देण्यात येणार पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई पोलिसांनी Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर 5 अधिकाऱ्यांवर कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनासाठी गुन्हा दाखल केला आहे.





























































