कौटुंबिक वादातून पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौटुंबिक वादातून पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पतीवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी 29 जानेवारीला कोथरूड परिसरातील भुसारी कॉलनीमध्ये घडली होती.

दीपक नामदेव काकडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. प्रीती दीपक काकडे (वय 32) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रीतीच्या वडिलांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. लग्न झाल्यानंतर दीपक वेगवेगळ्या कारणावरून प्रीतीला त्रास देत होता.

दीपक त्रास देत असूनही ती दीपकला काहीही बोलत नव्हती. सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून प्रीतीने गळफास घेत आत्महत्या केली. प्रीतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दीपक काकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस तपास करीत आहेत.