पैशांची मागणी करत विवाहितेची हत्या; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

615
प्रातिनिधिक फोटो

हळदीचा कूकर आणण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच पैशांची मागणी करत पतीनेच पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथे 25 मे राजी घडली. या प्रकरणी 28 मे रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात पती, सासू , सासरा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली, पोलिसांनी पतीसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाचेगाव येथील चंद्रकांता अनिल तळेकर यांचा विवाह अनिल दत्तराव तळेकर यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरा व दीर नेहमी पैशासाठी त्रास देत होते. चंद्रकांताची सासू निलाबाई तळेकरने हळदीचा कूकर आणण्यासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन ये, असा तगादा लावला होता. माहेराहून पैसे आणण्यासाठी सातत्याने त्रास देण्यात येत होता. 25 मे रोजी महितेचा पती, सासू, सासरा यांनी विवाहितेची गळा दाबून हत्या केली. यासंदर्भात कैलास रंगनाथ रणेर यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून महिलेचा पती अनिल दत्तराव तळेकर, सासू निलाबाई दत्तराव तळेकर, सासरा दत्तराव श्रीपतराव तळेकर आणि राधाकिसन दत्तराव तळेकर यांच्याविरुद्ध जिंतूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाण हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या