राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरेविरोधात बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण चांदेरेसह अन्य 14 जणांविरुद्ध मतदारसंघात मतदारांच्या याद्या घेऊन तसेच मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूराव चांदेरे हे पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभे आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच भारतीय न्याय संहिता कलम 223, कलम 171 आणि कलम 74 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूराव चांदेरे यांनी मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोपसुद्धा होत आहे.