
एटीएम मशीनमध्ये प्लॅस्टिकची पट्टी लावून ग्राहकांचे पैसे शिताफीने काढून नेणाऱ्या एका सराईत आरोपीच्या भांडुप पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय त्यांच्या सोबतीला येणाऱ्या व गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आरोपीकडून पोलिसांनी एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद जियाद ऊर्फ अयान इर्शाद अहदम याला भांडुप परिसरातून पकडण्यात आले. तर त्याच्यासोबत असणाऱ्या दोन सहआरोपी महिलांना नोटीस बजावण्यात आली.
प्रबळगडावर १३ ट्रेकर्स भरकटले; तीन तासानंतर सुटका
खालापूर : इर्शाळगड सर करून प्रबळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेले १३ पर्यटक आज दुपारच्या सुमारास भरकटले. याबाबत पनवेल पोलीस ठाण्याचे अधिकारी अभिजित वरांबळे यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह निसर्गमित्र टीमच्या मदतीने भरकटलेल्या ट्रेकरची शोधमोहीम हाती घेतली. तीन तासानंतर या ट्रेकर्सची सुखरूपपणे सुटका करण्यात आली असून रात्री उशिरा या सर्वांना पनवेल येथे आणण्यात आले. दरम्यान, हे पर्यटक कुठून आले होते याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.


























































