क्षुल्लक वाद तरुणाच्या जिवावर बेतला, दोघांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अज्ञात कारणावरून वाद झाल्यानंतर धक्काबुक्कीत तरुण डोक्याच्या मागच्या बाजूला आपटल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मानखुर्द येथे घडली. याप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मानखुर्दमधील मल्लेश ताडी सेंटरसमोर बालाजी नायडू (22) याचा कोणत्या तरी कारणावरून दोघा तरुणांशी वाद झाला. यावेळी धक्काबुक्की झाल्याने बालाजी डोक्याच्या मागच्या बाजूवर आपटला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोघेजण पसार झाले; पण मानखुर्द पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व खबऱयांच्या मदतीने सलमान शेख आणि गणेश रेडी या दोघा तरुणांना पकडले. दोघांकडे अधिक चौकशी सुरू आहे.