
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा घेण्यात येणार आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हे संभाव्य वेळापत्रक जारी केले आहे.
सीबीएसईने परीक्षेच्या आयोजनासंदर्भात एसओपी जारी केल्या आहेत. प्रत्येक शाळेला प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात येणार आहे. बोर्डाच्या वतीने प्रत्येक शाळेसाठी एका निरीक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. परीक्षेच्या मूल्यमापनावर लक्ष ठेवण्याचे काम हे निरीक्षक करणार आहेत.
- गेल्या वर्षीप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत परीक्षकासोबतच बाह्य परीक्षकही असेल.
- परीक्षेचे मूल्यमापन झाल्यानंतर बोर्डाने दिलेल्या लिंकवर गुण अपलोड करायचे आहेत.
प्रॅक्टिकल परीक्षेचा फोटो काढावा लागणार
सर्व शाळांना बोर्डाच्या अॅपवर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकवर परीक्षा सुरू असताना प्रत्येक बॅचचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. या ग्रुप फोटोमध्ये विद्यार्थी, बाह्य परीक्षक, अंतर्गत परीक्षक तसेच निरीक्षक दिसणे आवश्यक आहे.

























































