
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सीबीएसई आणि आयसीएस बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. केंद्र सरकारचे साँलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. याशिवाय परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करू असे न्यायालयात सांगण्यात आले.
देशभरात लॉकडाऊनमुळे मार्चमधील अनेक परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या राहिलेल्या परीक्षांचे नवीन केळापत्रक सीबीएसई बोर्डाने जाहीर केले होते. या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार होत्या. मात्र कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला अनेक राज्यांनी समर्थन ही दिले होते. सुनावणीवेळी बोर्डाकडून परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. दिल्ली तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारकडून परीक्षा न घेण्याबाबत ऋषी मल्होत्रा यांनी बाजू मांडली.
- शाळेत झालेल्या गेल्या तीन परीक्षांतील गुणांचे मूल्यमापन वरून गुण दिले जाणार.
- ज्या विद्यार्थ्यांचे सीबीएसईने दिलेल्या गुणांकर समाधान होणार नाही, असे विद्यार्थी काही महिन्यांनी होणार्या परीक्षेला बसू शकतात.
- सीबीएसई बोर्डाने परीक्षेसंदर्भात नव्याने सूचना जारी कराकी तसेच राज्य मंडळाच्या परीक्षांच्या स्थिती बाबतही उत्तर दाखल करावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले असून या याचिकेकर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
आयसीएसई पुन्हा परीक्षा घेणार नाही
आयसीएसई बोर्डाने पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिला आहे असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
























































